कविता :🌷” घायाळ “


कविता : 🌷" घायाळ "
कवयित्री : तिलोत्तमा विजय लेले

अंतर्मनाच्या गुहेतील लेणी खोदण्यामध्ये दंग
अधून-मधून मलाच मी, शोधत राहण्याचा छंद

सुटला जरी तीर हातामधुनी, घायाळ होतो मीच
माझ्याच निर्बंध मनाला, बंदीवान करतोही मीच

जरी सगळेच्या सगळे गेले, झिडकारून मलाही
मी वेचून जगणार म्हणूनी एकेक क्षण फुलापरि

कला-कलाने चंद्रमा उगाच लहान होत असताना
विझणा-या मनातही उठतो, कल्लोळ भावनांचा

कधी भंगलेल्या स्वप्नांच्या, त्या धूसर सावल्यांना
पाठीवर बसवूनी हिंडतो, सर्वच विक्रम-वेताळांना

🌷 तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉🔆

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: Content is protected !!