कविता – 🌷 ” घननीळा “


कविता - 🌷 " घननीळा "
कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले

अप्रतिम रंग-संगतीची ही सुंदर उधळण,
त्यावरी शोभे लाल-सोनेरी मोहक कोंदण

भुरभुरणारी क्षण-दोन-क्षणांची, ती बौछार
अनंत-अखंड-अगणित थेंब-थेंब चमकदार

लवाजम्यासकट प्रत्यक्ष, प्रकटतो खट्याळ
जणू थेंबा-थेंबामधून डोकावून करी घायाळ

थेंबांच्या माध्यमातून लकाकती बिंब हजार
लपंडावाचा हा अद्भुत खेळ आहे सदाबहार

हळूहळू ऊन-पाऊसानं चांगलाच धरता फेर
नंतर उलगडा-रहस्याचा, एक ढगच छुपा हेर

छुप्या गुप्त गोष्टींना, मिळाला जेंव्हा उजाळा
पार सुसाट पळून गेला तो ढग काळा-काळा

पंखांची फडफड करुन, मयूरेश निळा-निळा
मधुर वेणू-नाद वाजवितो घनश्याम घननीळा

🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉🔆

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: Content is protected !!