कविता :🌷’ गुढी उभारु ‘

कविता :🌷' गुढी उभारु '
कवयित्री : तिलोत्तमा विजय लेले
तारिख : २२ मार्च २०२३

गुढी म्हणजे "ब्रह्म-ध्वज"
जणू संगितातील षड्ज !

गुढी उभारु नव-चैतन्याची
सळसळणा-या तरुणाईची !

गुढी उभारु उदारपणाची
उदात्त उन्नत मानवतेची !

गुढी उभारु सद्-सद्-विवेकाची
अनैतिकतेला आळा घालण्याची !

गुढी उभारु शौर्याची-वीरतेची
देश-द्रोहींना धाडण्या यमसदनी !

गुढी उभारु नव-तेजाची
मूल्यांना पुनर्जीवित करण्याची !

गुढी उभारु क्षमा-शीलतेची
पश्चात्ताप-दग्धांना संधी देण्याची !

गुढी उभारु वैचारिक शुचितेची
मन-बुध्दी-देहाच्या विशुध्दतेची !

गुढी उभारु अथक-परिश्रमांची
अपुरी सत्कार्ये पूर्ण करण्याची !

गुढी उभारु आत्म-विश्वासाची
विश्वभरात पुन: श्रेष्ठ होण्याची !

गुढी उभारु प्रामाणिकपणाची
दांभिकपणाला आवर घालण्याची !

गुढी उभारु महापराक्रमी विजयांची
मुजोर अधमांना पाणी पाजण्याची !

गुढी उभारु आत्मिक संपन्नतेची
सुजलाम्-सुफलाम् धरती-मातेची !

@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: Content is protected !!