कविता -🌷 ” गहिरी निळाई “


कविता -🌷 " गहिरी निळाई "
कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले

आकाशाची निळाई डोळ्यांनाही किती सुखावते
एखाद्या माणसातील भलाई अंत:करण हेलावते

मोराने चौफेर पिसारा फुलवला की नजर खिळते
एखाद्या निळसर मिश्किल डोळ्यांवर मन भाळते

हिमाच्छादित कैलास-दर्शनाने, मन उचंबळून येते
मानसरोवरी-निळं-पारदर्शी-जळ,तन-पावन करते

लडाखला निळं-नभ जेंव्हा निळ्या-पाण्यात उतरते,
साक्षात् घननीळाच्या स्मरणाने, मन भारावून जाते

ही गहिरी निळाई मनात तरल स्पंदने निर्माण करते
अन् सृष्टीच्या अदृष्य-अद्भुत-शक्तिशी एकरुप होते

🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉🔆

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: Content is protected !!