कविता :🌷' गगन ठेंगणे '
कवयित्री : तिलोत्तमा विजय लेले
तारिख : बुधवार, २१ ऑगस्ट २०२३
वेळ : सकाळी, ११ वाजून ४९ मि.
या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे...
शतदा प्रेम करावे..., शतदा प्रेम करावे..., शतदा प्रेम करावे...
ज्येष्ठ नागरिक हे चालते-बोलते विद्यापीठ अनुभवाच्या शिदोरीचे
तरुणांनी ज्येष्ठांच्या प्रयत्नांचा, कर्तृत्वाचा सन्मान करणे जरुरीचे
वयोवृद्ध नागरिकांचे कर्तृत्व कामगिरी आणि योगदान ओळखून
नवीन पिढीने त्यांची आणि त्यांच्या समस्यांची योग्य दखल घेऊन
ज्येष्ठांचा वर्तमान सुकर व्हावा म्हणून‘उद्याच्या वृद्धां’ची साथ हवी
ज्येष्ठांच्या समस्यांकडे डोळसपणे पाहायला,मनी सहानुभूती हवी
शारीरिक दुर्बलता, नव-तंत्रज्ञानाची कमतरता यांमुळे होतात त्रस्त
अनादर, दुर्लक्ष,असहानुभूतीच्या वागणूकीमुळे ज्येष्ठ निराशाग्रस्त
सध्याच्या तरुणांचा दिनक्रम फार दगदगीचा अन् तणावपूर्ण आहे
एकूणच जीवनशैली अत्यंत खर्चिक, अशाश्वत व तणावपूर्ण आहे
खरंतर भविष्यात प्रत्येकजण कधी ना कधी वृद्ध होणारच असतो
ही जाणीव तरुणपणी कोणालाच नसते,म्हणूनच बेफिकीर असतो
बहुतेक या बेपर्वाईतून प्रश्न उद्भवतात, दोन्ही पिढ्यांनी एकमेकांस
समजून तडजोडी केल्या तर,घरोघरी सगळे सुख देतील परस्परांस
एकाकी वृध्दापकाळी,आपलेपणाने कुणी वागले,दोन बोल बोलले
तरी ज्येष्ठांना,जणू प्रत्यक्ष "गगन ठेंगणे झाले की काय" असे वाटते
🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆
Leave a Reply