कविता – 🌷 ” खुमारी “
कवयित्री – तिलोत्तमा विजय लेले
तारिख – बुधवार, ११ मे २०१६
यंदाच्या आँगस्टमध्ये पक्कं ठरवलंच होतं,
कि येणाऱ्या नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यातच,
ऑस्ट्रेलियातील थेट सिडनी-शहर गाठायचं …
दोन्ही मुलांची गुप्त खलबतं-खास योजना,
काय-काय करायचं आईच्या वाढदिवसाला …
तरुण तन-मन, तरुणाईचा पुरेपूर जोश होता
त्यांचा उत्साह नुस्ता ओसंडून वाहत होता …
ब-याच विचारांती त्यांचा निर्णय झाला होता …
तीन वेगळ्या देशांतून-खंडातून एकत्र जमायचं,
एका नवीन-न पाहिलेल्या-देशात तिला न्यायचं,
अन् एकदम तिला “सरप्राईज” करुन टाकायचं …!
तिच्या कानावर ही तथाकथित ‘गुप्तबातमी’,
खास-गुप्त-गोटातून, उडत-उडत आली होती…
असं असतानाही “सरप्राईज” होण्यासाठी ती,
नेहमी प्रमाणेच होती मात्र, पुरती आसुसलेली …
दोघंही अगदि लहान होती, तेव्हापासूनचे किस्से …
पिगी-बॅंकेतून गुप-चुप जमा केलेले खाऊचे पैसे …
त्यांची गोड गुपितं दबक्या आवाजातील खुसफुस …
ड्रॉइंग काढून-रंगवून तयार केलेली ग्रीटिंग कार्ड्स …
त्या लडिवाळ-निरागस शुभेच्छा-पत्रांची बरोबरी,
महागड्या-प्रसिद्ध-चित्राकृतींचीही, नाही मातब्बरी …
आजवरच्या तिच्या प्रत्येक वाढ-दिवसाची खुमारी,
शत-शत लक्ष-लक्ष-पटीनं अधिक-सुमधुर व्हायची …
🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆
Leave a Reply