कविता :🌷’ खरी शिदोरी ‘ कवयित्री : तिलोत्तमा विजय लेले

कविता 🌷’ खरी शिदोरी ‘

कवयित्री : तिलोत्तमा विजय लेले
तारिख : शनिवार, १० जून २०२३
वेळ : ११ वाजून ०६ मि.
माणसा तुझी रीतच उफराटी
काहीही करशील स्वार्थापोटी
पैशामागे धावशील उठा-उठी
चुकांमुळे पस्तावशील रे शेवटी!

खस्ता खाऊन ज्यांनी वाढविले,
त्या आई-वडिलांसाठी काय केले ?
मोठेपणी त्यांना हवे-नको विचारले ?
श्रावण बाळ बनून तीर्थक्षेत्री नेले ?

गोर-गरिबांना उचलून काही दिले ?
गरजू विद्यार्थ्यांना विद्यादान दिले ?
कधी आपण होऊन श्रमदान केले?
कधी पुढाकार घेऊन रक्तदान केले?

माणूस म्हणून माणुसकी दाखवली?
त्रास सोसून दुसऱ्याची मदत केली?
मुक्या प्राण्यांवर भूतदया दाखवली?
स्वतः प्रामाणिकपणे वाटचाल केली?

नि:स्वार्थीपणे कुणाची सेवा केली ?
मनापासून देवाची आळवणी केली?
कधी गरजूला मदतीचा हातही दिला?
कधी अडी-नडीला उपयोगी पडला?

जीवनाच्या कैफात सगळं विसरशील
तारुण्य ओसरलं की भानावर येशील
वृद्धापकाळी मागचं आठवून रडशील
देवापुढे हात जोडून गा-हाणे सांगशील

उभा जन्म पै-पैसा गोळा करण्यापेक्षा
जिवाला जीव देणारी माणसं महत्त्वाची
इथेच राहतो पैसा-अडका-कपडा-लत्ता
माणुसकी-प्रेम-मैत्री हीच खरी शिदोरी !

@तिलोत्तमा विजय लेले

🙏🕉️🔆

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: Content is protected !!