कविता : 🌷 ‘ खरा कर्मयोगी ‘

तारिख – रविवार, ९ एप्रिल २०१७
कवितेचं नाव-🌷” खरा कर्मयोगी “
कवयित्री – तिलोत्तमा विजय लेले 

अशारितीनं सरडे सरांनी, सगळ्याच परीक्षार्थींची
मस्त-साग्र-संगीत-खाशी बडदास्त ठेवलेली होती…!

विशेष म्हणजे त्यांना बेगडी मोठेपणाची,
किंचितशीही अपेक्षा अजिबातच नव्हती !
स्वतः त्याचा कधी उच्चारही सरडे सरांनी,
केला नव्हता, ना शाळेत-ना बाहेर कुठेही …

पण विद्यार्थ्यांच्या र्तोंडात, तीळ भिजेल तर शप्पथ !
दुसरा दिवस उजाडताच सगळ्या परीक्षार्थींच्या तोंडून
रसभरीत असं वर्णन ऐकून, ही गोष्ट शाळाभर झाली 
शाळा-व्यवस्थापनाच्या कानी तपशीलवार बातमी गेली 

मुख्याध्यापकांनी तातडीची, सर्व-शिक्षक बैठकच बोलावली 
लेकी बोले सूने लागे-या धर्तीवर पण सद्हेतुनं-चांगल्याअर्थी
सरडे सरांचं खूप कौतुक केलं, मग गुपचुप उर्वरित शिक्षकांनी  
खर्चाचा अंदाज बांधून, आपसात ऐच्छिक रक्कम गोळा केली 

सरडे सरांना, सन्मान-पूर्वक तेच पैसे एका पाकीटात घालून
टाळ्यांच्या गजरांत ते पाकीट मुख्याध्यापकांच्या हस्ते दिलेलं 

या उत्स्फूर्त कृतीमुळे प्रेरणा मिळून, शाळा-ट्रस्टींकडून देखिल 
सरडे सरांना आमंत्रित करुन मानाने दिली होती रोख रक्कम !
हे सर्व घडलं इतकं अचानक की एकदम झालेल्या वर्षावामुळं,
अनपेक्षित झालेल्या स्तुतीमुळे सरडे सर सपशेल गेले गोंधळून 

मिरजेची साधी-सरळ-असामी, या वळवाच्या मुसळधार वृष्टींनी
मानसन्मान-हार-तुरे-स्तुती-सुमनं-कौतुकाच्या चौफेर भाषणांनी  
आतून भरुन येऊन, ” “माझी, आयुष्यभराची मेहनत फळा आली”
“ईश्वरीय-सद्गुगुरु-कृपेमुळे माझ्या जीवनाची इति-कर्तव्यता झाली” 

जेमतेम असं अत्यंत गहिवरुन बोलून, कोणाचे आभारही न मानता
सरडे सर लगबगीनं खालीच बसले गलबलून, गहिवर न आवरता 
भगवद्-गीतेत म्हटल्याप्रमाणे, फळाची अपेक्षा न करता अल्पशीही 
प्रत्यक्षात निरपेक्ष भावनेतून कर्म करणारे, ते निष्ठावान कर्मयोगी …

आज हाती दिवा घेऊन शोधूनही सापडणार नाही-अशी महान व्यक्ति 
उभं आयुष्य, “शिकविण्याचा ध्यास घेऊन-शिक्षण-क्षेत्रास वाहीलेली” 

🌷@तिलोत्तमा विजय लेले 
🙏�🌅🕉🌷🙏











Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: Content is protected !!