कविता -🌷’ खराखुरा आदर्श ‘
कवयित्री : तिलोत्तमा विजय लेले
तारिख : गुरुवार, ३० मार्च २०२३
” पुत्र व्हावा ऐसा गुंडा, ज्याचा तिन्ही लोकी झेंडा “
ही प्रसिद्ध ओवी संत तुकाराम महाराज यांची आहे
नवसासायाने कौसल्येच्या पोटी श्रीराम जन्माला आला
मानवतेचा आदर्श संदेश, त्यानं कृतीतून विश्वाला दिला !
एक आदर्श, आज्ञाधारी-पुत्र म्हणून जो स्वीकारला गेला,
सर्व भावंडात आदर्श-ज्येष्ठ-बंधू म्हणून तो मानला गेला !
शक्तिशाली शिवधनुष्याला प्रत्यंचा लावून ‘पण जिंकला’
सुंदर, सुशील, राजकन्या जानकीशी तो विवाहबद्ध झाला
ज्या काळी-समाजात पुरुषवर्ग सर्रास बहु-पत्नी करायचा,
आदर्श-पति म्हणून एक-पत्नि-धर्माचा अंगिकार त्यानं केला
वाजत गाजत सीतेसह श्रीराम, अयोध्या-नगरीत प्रवेशला
प्रजेच्या आनंदोत्सवाचा स्वीकार करत, विराजमान झाला
कैकेयीला दिलेल्या दशरथ-वरानुसार वनवास त्यानं भोगला
पत्नी सीता व बंधू-लक्ष्मणसह पूरी चौदा वर्षं वनवासी झाला
रावणाने कपटाने, सीतेचे हरण केल्यानं वेडापिसा तो झाला
सामान्य मानवाप्रमाणे दुःखातिरेकाने धाय मोकलून तो रडला
नंतर भानावर येत, जानकीला शोधून काढण्याचा चंग बांधला
हनुमान-सुग्रीव-सेनेच्या मदतीनेच सीतेला शोधून काढू शकला
घनघोर रणसंग्राम करून, रावणादी दानवांचा नि:पात केला,
लंकेवर विजयश्री मिळवून सीतेला घेऊन अयोध्येला लोटला
आदर्श शासनकर्ता म्हणून तिन्ही-लोकी लौकीक मिळवला !
यथावकाश लव-कुश या पुत्रांसह राज्य-कारभार सांभाळला
मानवतार म्हणून देहत्याग करुनही, इतिहासात अमर झाला !
कृतीने, कर्तृत्वाने, नैतिकतेने, आचरणाने आदर्श मानला गेला
मानवी अवताराच्या सर्व मर्यादा आयुष्यभर सांभाळत राहीला
म्हणूनच ‘मर्यादा-पुरुषोत्तम’ या नावानेही सन्मानीत केला गेला
कौसल्या-पुत्राने खराखुरा आदर्श, कायम-स्वरुपी घालून दिला
तुकारामांच्या ओवीतला सत्य मतितार्थ, जीवनातून सिध्द केला !
@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆
Leave a Reply