कविता -🌷 " कोना-कोपरा भरुन सुख "
कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले
तारिख - २ ऑगस्ट २०२४
वेळ - दुपारी, १ वाजून १९ मि.
जुन्या जमान्यामधे फारशी चैन नव्हती
पण खाण्या-पिण्याची ददातही नव्हती
पैशांचा खूप खुळखुळाट जरी नसला,
तरी कुणी कर्जात-बुडलेलाही नव्हता
कुणाकडे गर्भश्रीमंती उतू जात नसली
तरी एकमेकांच्याकडे येत-जात सगळी
घरोघरी मनापासून स्वागतच होत असे
हसंत मिळून-मिसळून, काम होत असे
मनामध्ये प्रवृत्ती चांगली होती म्हणूनच
सामान्य-स्थितीमधेही जास्त मजा होती
खोटा दिमाख वा दिखावा बिल्कुल नसे
घरगुती-पद्धतीच्या-पदार्थांचे-अप्रूप असे
लाल-हिरवं-पिवळं, सुवासिक तेल असे
खोबरेल-तेलात मिसळून सर्व वापरायचे
उत्साह-आनंद मात्र तुडुंब काठोकाठ असे
सख्खं-चुलत असो नातं,फरक वाटत नसे
घराचा कोना-कोपरा भरुन सुख असताना
ख-या अर्थाने प्रत्येक सण साजरा व्हायचा
🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆
Leave a Reply