कविता - 🌷 " कोण सूत्रधार "
कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले
बासरीची धुन ऐकून वेडी-खुळी होई राधा,
गोपी म्हणती,"कुणाची गं बाई झाली बाधा"
मोह-माया करविते खेळ सारेच जगा-वेगळे
कोण हळूच लावी गगनात हे चमचमते तारे
पौर्णिमेचा चंद्रमा, लुकलुकला नभा अंतरी
काळ्या रात्री, चमचमती चांदण्या अधांतरी
मन-गाभा-यात आभाळ, डोळे मिटता दिसे
दृश्य असे मनोहर, का लावीते मनाला पीसे
अवर्णनीय हर्ष मनीचा दृश्य होत, बरसला
लज्जेचा-रंग-गाली लालिमा-होऊनी-आला
संभ्रम आहे, कोण सूत्रधार या सृष्टी-पटाचा
जो पडद्या-आडूनच अलगद-खेळवी-सर्वांना
जणू म्हणतोय "पट तू हारा, चित मैं जीता"
संपूर्ण सृष्टीच्या चराचरी त्याचीच महासत्ता
🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉🔆
Leave a Reply