कविता : 🌷' कैफियत कॉफीची '
कवयित्री : तिलोत्तमा विजय लेले
प्रत्येकालाच कोणता ना कोणता तरी छंद असतो
बघता-बघता त्या छंदाचं रूपांतर “वेडात” होऊन
त्याच्या नकळतच त्या वेडाचा चक्क “कैफ”बनतो
हे एवढ्यावरच थांबलं तर ठीक, नाहीतर प्रकरण
पुढची मजल गाठून, त्या वेडाची नशा बनू बघतं
ती नशा प्रेमाची, कर्तव्याची, शिस्तीची, सुंदरतेची
कडक, गरम, वाफाळत्या चहाची किंवा कॉफीची
चहा-कॉफीवीण या महाभागांची सकाळ होत नाही
इतकेच नव्हे तर चहा-कॉफीवीण डोकं चालत नाही
आज कॉफी-डे म्हणून, ही कॉफी-वेडाची कैफियत
एकवेळ यांना खायला-जेवायला नसलं तरी बेहत्तर
पण कॉफीपानाशिवाय यांचं पान हलेल तर शप्पथ
सकाळ-दुपार-संध्याकाळ यांचा अड्डा‘कॉफीशॉपवर’
तासंतास सर्व मित्र-मंडळींच्या गप्पागोष्टींचाच कहर
पूर्वी “ फ्रेंड्स“ नामक मालिका होती याच विषयावर
बघायला गेलो तर कॉफीचे डझनावारी आहेत प्रकार
एखाद्या नवशिक्याला सहजच गोंधळून टाकतील पार
पण याच गोष्टींची, तरूणाईला अपूर्वाई आहे अपरंपार
🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆
Leave a Reply