कविता -🌷 " केल्याने होत आहे रे "
कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले
तारिख - शनिवार, २९ जून २०२४
वेळ - सकाळी, १० वाजून १५ मि.
माणसाला षड्रिपुंना थोपवून ठेवायला
सुसज्ज प्रतिकारशक्ती हवी असायला
शरिरात अवयवांच्या योग्य हालचाली
दररोजच्या करायला हव्यात कसरती
फार काळ निष्क्रीय शरिर, म्हणजेच
रोग-प्रादुर्भावाला उघडपणे आमंत्रण
मानवी-शरीर सूक्ष्म संदेश देतच असतं
ते नीट समजून दखल घेणे आवश्यक
पाठदुखी हा सावधतेचाच एक इशारा
नाहीतर कंबरेला पट्टा लागेल मिरवावा
चाळीशीत गुडघे झाले जर कमकुवत
उठणे-बसणे-चालणे करती कुरकुरत
तज्ञ-डॉक्टर म्हणतात, गुडघ्याची वाटी
बदला, नाहीतर येईल हातामध्ये काठी
नित्य प्राणायामाने, चेहरा होतो सतेज
म्हातारपणातही माणूस चपळ, तरबेज
स्वतः केल्यानेच सर्वकाही जमू शकतं
अशक्यप्राय असं जगात काहीच नसतं
निश्चय करुनी गोष्ट घेतली, जर मनावर
कठीण असूनही, घेता येईल ती शिंगावर
समर्थ श्री रामदास स्वामींनी म्हणून म्हटले,
"केल्याने होत आहे रे आधी केलेचि पाहिजे"
🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉
Leave a Reply