कविता - 🌷 ‘ कृष्ण-कृष्ण नाद '
कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले
स्त्रीच्या सात्विकतेची तुलना,
तुळशीच्याच पवित्र-रुपाशी...
त्यागाची प्रत्येक भावनाही,
थेट मिळती-जुळती-तुळशीशी !
तुळशीची विष्णुमय-भक्ति,
तिचा अनुरागही साधा-सुधा...
जणू तिच्या कणा-कणांतून,
साकारते श्रीकृष्ण-वेडी-राधा !
श्रीविष्णू-पूजन करते वेळी,
तुळशीची उपस्थिती जरूरी...
सत्य-नारायणाच्या पूजेसाठी,
हवी-एक-हजार-पाने-तुळशीची...
वार्यावर डोलणार्या मंजिरीतून,
सहज रुजलेले एखादे रोपटे...
समीप त्याच्या जाता त्यातून,
जणू "कृष्ण-कृष्ण" नाद उमटे !
🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆
Leave a Reply