कविता-🌷” कुमारी स्वरूप “

कविता-🌷" कुमारी स्वरूप "
कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले

देवी दुर्गेनेच अष्टम्-अवतार घेतला,
कोवळी, सुन्दर आठ वर्षांची बाला
घोर तपाने तिचा गौर वर्ण लपलेला
अत्यंत निष्पाप, कोमल-अशी-बाला...

गंगास्नान करून मूळची गौर-कांती
तेजस्वी बिजली-परि चमचम करती
'महागौरी'-नाव तिचे स्वच्छ गौर-वर्ण
नंदीवर आरूढ तेज:पुंज जणू सुवर्ण...

अलौकिक ज्ञान-अनुभूती ध्यानामुळे
वाढतेच श्रद्धा-विश्वास-निष्ठा त्यामुळे
योग्य मार्गदर्शन देवीचे मिळाल्यामुळे
जीवन सुखकर होऊन तृप्तीही-मिळे...

भारतीय परंपरेत, पूजा कुमारिकेची
पूजा देवीच्या-कुमारी-बालस्वरूपाची
देवीस आवड, गीत-संगीत, काव्याची
त्यावीना राहील अपूर्ण पूजा, देवीची...

कितीही येवोत संकटे-दुःख अन् कष्ट
महागौरी करी रक्षा करुन शत्रुत्व नष्ट
नाश करी व्याधी-जरा-रोग वा दुष्टत्व
हाकेला धावून येऊन संपवीते अरिष्टं...

🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏 🕉🔆

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: Content is protected !!