कविता 🌷 ‘ किमया चंद्रकोरीची ‘

कविता -🌷 ‘ किमया चंद्रकोरीची ‘
कवयित्री – तिलोत्तमा विजय लेले
तारिख – गुरुवार २८ सप्टेंबर २०१७ 

नाजूकशी कोर चंद्राची आभाळी डोकावते,
मंद मंद प्रकाशाला, कवेत घेऊन खुणावते !

ती नाजुक-नवतरुणीच्या भाळी खास शोभते,
अन् तिच्या सौंदर्याला अधिकच मोहक बनविते 

भाळीच्या त्या चंद्र-कोरीवर पडता एक नजर,
नव-युवकांच्या तना-मनाचा होतो धुंद भ्रमर !

कोणी रोज जीन्स-टीशर्ट मध्येच वावरणारी,
नऊवारी साडी नेसून नटून-थटून सणावारी,

निघाली चंद्र-कोर कोरून, मध्यमशा लयीत
शेंकडों पाहणार्यांच्या जणू हृदयांना चिरीत !

दोष कोणाचा, ना त्या मुलीचा वा युवकांचा
सर्व मामला आहे, त्या सुरेखशा चंद्र-कोरीचा !

भोळा कान्हा-खट्याळ चंद्र-खुणावे वेळीअवेळी
धुंद-वेड लावी जिवा-बावरी झाली राधा-भोळी

दोष नसे यमुनेचा, ना राधेचा-अथवा रजनीचा
सगळाच खेळ आहे हा, लबाडशा चंद्र-कोरीचा !

बागडत राही नभी, हळूवार छेडी चांदण्यांना 
मिचकावून डोळे, पांघरूण घाली खोड्यांना !

सर्व प्रेमिकांचा लाडका, देखणा असा हा शशी
वाटतो नित्य-नवा, जरी दिसतसे दरेक-दिवशी !

ही किमया सारी प्रेमाची, कोणीच नाही दोषी
अनभिषिक्त राजे-महाराजे-नभीचे, रवी-शशी !

अनभिज्ञ भावना, अजाणतं वय, प्रीतिची नशा
मोहक-सुंदर या सगळ्याच, आयुष्याच्या दशा …

🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🌅






Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: Content is protected !!