कविता – 🌷 ” कवयित्रीच्या दृष्टीकोनातून “
कवयित्री – तिलोत्तमा विजय लेले
तारिख – १ जानेवारी २०१७
” दहा शिर, वीस हात, वीस पाय असलेला दशानन “…
कवयित्रीच्या नजरेतून याचा अर्थ, भिन्न भिन्न रूपानं …
दहा-डोकी असलेली व्यक्ती म्हणजे दसपट बुद्धिमान …
वीस हात आणि पाय असणे म्हणजे दसपट बलवान …
एकूण मतितार्थ एकटा रावण ताकदीनं दहांच्या समान …
रावणाने महादेव-आराधनेत फुलांच्या ऐवजी, स्वतःचं एकेक शिर-कमल…
शिव-शंभोस अर्पण केलं-त्याच्या या कृतीचा प्रतिकात्मक स्वरूपाचा अर्थ,
रावणानं विद्वत्ता-बुद्धी-चातुर्याने मनं-बुद्धी-मानस-चित्त-अंत:करण-अहंकार…
या दश मनोदशांचा-मनोवृत्तींचा पूर्ण-त्याग केला, प्रसन्न होऊन शिवाने दिलं दर्शन…
महर्षी वेद-व्यास यांच्या प्राचीन रामायण या महा-काव्याचा हाच खलनायक-रावण…
नायक-श्रीराम याला शोभेल असाच, जितका रावण अहंकारी त्याच्या विरुद्ध…
एकवचनी, एक-पत्नी, आज्ञा-धारक, सर्वांनाच आपलंसं करणारा-श्रीरामचंद्र …
पुत्र-धर्माचं, पति-धर्माचं, राज-धर्माचं, नित्य-पालन-करणारा सुस्वभावी, शांत
श्री विष्णूचा सातवा अवतार महा-पराक्रमी, धीर-गंभीर, रघु-नंदन श्री-राम-चंद्र …
रावणाने ज्यांना अत्यंत-तुच्छ लेखून, ब्रह्माच्या अभय-दानातून वगळलं,
ते मनुष्य आणि वानर, ज्यांच्या पासून त्याच्या जीवाला धोक्याचा संभव …
रावणाने सोन्याची बनवून लंका-श्रेष्ठतम बुद्धीजीवींना, आश्रय दिला होता…
नवं-ग्रहांना अधीन करून ठेवल्यामुळं, काळावरही मायावी-जय मिळवला …
रावणाच्या भक्कम अधिपत्या-खाली, दानव-मंडळी फारच माजलेली होती …
त्यामुळे राज्यात दानवी-राक्षसी-वृत्तींनी बहकून जाऊन केलं होतं त्राही-त्राही…
त्यामुळे तिन्ही लोकांत-स्वर्ग, पृथ्वी आणि पाताळात प्रचंडं दहशत निर्माण झाली…
त्यावर कहर-रावणाने सीतेला पळवून, आयुष्याच्या अंतिम दुष्कृत्याची कडीच केली…
प्रिय-पत्नी-सीतेला शोधण्याच्या कार्यारंभी-रामेश्वराच्या सागर तटी, रामाने पूजा केली …
वाळूच्या शिवलिंगाची स्थापना करुन, पूर्ण मनोभावे महादेव-शिव-शंभूची अर्चना केली …
सुग्रीव व जांबुवंत यांच्या आदेशानी-नल-नील भावा-भावांनी पूर्ण वानर-सेना गोळा केली …
मनोभावे”जय श्रीराम”म्हणून शिला पाण्यात टाकून, लंकेपर्यंत समुद्र-पूलाची बांधणी केली…
त्यावरुन समुद्र लांघून, प्रभू श्रीरामांनी हनुमान, लक्ष्मण व वानरसेनेसह लंकेवर चढाई केली…
एक मनुष्य, वानर-सेनेसह समुद्र लांघून लंकेला येईल, हे रावणाच्या ध्यानी-मनी सुध्दा नव्हतं …
त्याचं मनोधैर्य पार खच्ची झालं-पोटात भीतिचा गोळा येऊन-आत्म-विश्वास झाला डळमळीत …
लंका हे बेट आहे-त्याच्या चारी बाजूंना पाणी-त्यामुळे हल्ला होण्याची शक्यताच नाही …
रावणाच्या भ्रमाचा-हा-भोपळाच-फुटला आणि त्याच्या तोंडचं खरोखरचं पळालं पाणी …
दुष्ट-दानवी-प्रवृत्तींच्या समूळ उच्चाटनासाठीच मानवी अवतार घेऊन आले, चक्रपाणी …
🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆
Leave a Reply