कविता :🌷’ कर्ता करविता ‘

कविता :🌷' कर्ता करविता '
कवयित्री : तिलोत्तमा विजय लेले

आदि, अनादि, अनंत-अनाकलनीय, तू बाप्पा मोरया
तुझ्या पवित्र आगमनाने, भारावले तन-मनं रे गणराया

तुझ्या आशिर्वचने सद्बुद्धी-सद्शक्ति-सफलता मिळो
मनांत साचलेली जळमटे नष्ट होवो, सर्वां शांति मिळो

अनंत चतुर्दशीच्या दिवशी, बांधू "सत्कर्मांचे-अनंत-सूत्र"
ऋण फेडू-मातपित्याचे, कुटुंबियांचे, देशाचे-होऊ-सुपुत्र

विसर्जित करु आळस-व्यसन-व्याधी, अंगी बाणू नम्रता
आप-पर-भाव त्यागू, नव-विचार, नव-चैतन्याची शुचिता

आम्ही केवळ नाम-मात्र, कर्ता-करविता, तूच बुद्धिदाता
सत्कर्म-सत्कार्य घडवून, या जन्माची व्हावी रे सार्थकता

🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: Content is protected !!