कविता – 🌷 ‘ कर्णाची महानता ‘

कविता - 🌷 ' कर्णाची महानता '
कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले
वेळ - रात्री, १० वाजून ३० मि.

अगदी जन्मापासून, कर्णाच्या नशीबात दुर्गती
आई असूनही निष्पाप-बाळ पाण्यात-एकाकी

शौर्य, बुद्धिमान-तेज:पुंज कर्ण, तरी वेळोवेळी
कैक शाप भोगले, अपराध काहीच नसतानाही

कदाचित तेही कमी या शूर वीराला हरविण्यास,
खबरदारी म्हणून स्वतः देवेंद्र आला, भेटण्यास

ब्राह्मणरुपी-इंद्राने कर्णाकडून दान मागून घेतलं,
सूर्योपासनेवेळी-त्याची-जन्मजात कवच-कुंडलं

जन्मजात-कवच-कुंडले "दान"म्हणून मागीतली
हे दान नव्हे, जणू कर्णाची"प्राणाहुती"मागीतली

तरीही तो "दान-शूर-कर्ण, " मागे नाहीच हटला
उदार-दिलदार-कर्ण स्वतःच्या शब्दाला"जागला

ऐन युद्धाच्या आदल्या रात्री, जन्मदात्या कुंतीनं
कर्णाला भेटून सांगितलं, रहस्य त्याच्या जन्माचं

विशाल-मनाच्या-कर्णाकडून, घेतलीं दोन वचनं
युद्धात सहापैकी पाच-पुत्रांना जीवित ठेवण्याचं

याशिवाय युद्धामध्ये कोणतंही अस्त्रं-शस्त्र फक्तं
एकदाच वापरण्याचं, पक्कं वचनही घेतलं तिनं

जन्माचं रहस्य सांगून, हा मनस्वी धक्का देऊन
त्याला दुर्बल करण्याचा, हा केविलवाणा प्रयत्न

"सूत-पुत्र-कर्ण"असा जो अपमान होई दरवेळी
तेंव्हा मूग गिळून गप्प बसणारी, हीच माता-कुंती

तिला कर्ण-अर्जुन युद्धाच्या नेमक्या आदल्या रात्री
जन्मताच त्यागलेल्या कर्णाची आठवण का व्हावी ?

स्वार्थी-कुंतीच्या मनाच्या कोतेपणाची कमाल वाटते
वयाने जरी लहान कर्णाच्या मनाची महानता प्रकटते

🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: Content is protected !!