कविता :🌷’ ओलेती ‘
कवयित्री : तिलोत्तमा विजय लेले
तारिख : सोमवार, २६ जून २०२३
वेळ : ११ वाजून २९ मि.
आलं आभाळ दाटून
झालं सावळं-सावळं
भूमी आतुर होऊन
अंतरंगी खळं-बळं
भुरुभुरु पाऊस पडतो
मनास भुरळ घालतो
वा-याची झुळुक होऊन
कानी संदेश तो देतो !
ओल्या मातीचा सुगंध
मनास बेधुंद करीतो
मनाचा गाभारा भरून
हुंकार भरू लागतो !
पाना-पानावर थेंबांची
नक्षी कोरीव काढतो
दिमाखात सारी सृष्टी
चिंब ओलेती करीतो !
@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆
Leave a Reply