कविता - 🌷 ' एक शापित जीवन '
कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले
युद्ध-कलेची सुध्दा ठराविक असते नियमावली
प्रत्येक लढवैयाने असते स्वेच्छेने स्वीकार केली
अर्जुन शस्त्र-हीन असताना-कर्ण-अर्जुन युद्धात,
कर्णाने जीवनदान दिले होते-निःशस्त्रं-अर्जुनास
इतकं सारं करुनही, शूर कर्णाचीच बाजू वरचढ
त्यामुळे जगातील युद्ध-नियम बसवून धाब्यावर,
संधी साधून-बाण वेधून कर्णाचा करु शकले अंत
कुरु-क्षेत्रावरील फसवणूकीचे हे लज्जास्पद कृत्य
दुर्दैवाने जमिनीमध्येच रुतलेले, कर्णाचे रथ-चक्र
पाठमोरा कर्ण काढण्याच्या प्रयत्नात असतानाच
अर्जुनाने गाफील कर्णाच्या पाठी शरवर्षाव केला
मृत्यू-दान दिले, उदात्त उदार-महान-शूर-कर्णाला
जीवनदानाच्या बदल्यात केला मृत्यूचा क्रूर आघात
पांडव विजयी झाले, पण कर्णानेच केली खरी मात
कर्णाची आहुती देऊन, पांडव विजयी होऊ शकले
महाभारताच्या वाचकांच्या मनातून कायमचे उतरले
सर्व नियम उल्लंघून सूर्य-पुत्र-कर्णाचा दारुण अस्त
सत्यता पटवतो की "कर्णाचे अवघे जीवन शापित" !
🌷@तिलोत्तमा विजय लेले
Leave a Reply