कविता - 🌷 ' एक कप्पा '
कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले
तारिख - बुधवार, ८ मे २०२४
वेळ - रात्री, १० वाजून २९ मि.
एखादं गाणं, प्रसंग अन् व्यक्तीचं समीकरण
तसं शास्त्रीय संगीत, नाट्य-गीत अन् शशीचं
शशिकला उर्फ शशी ही पट्ट-मैत्रीण शाळेची
तिची आणि माझी पक्की गट्टी होती जमली
नाटक असो की नाच आमचीच जोडी खास
नेहमी एकमेकांना देत असू, घासातला घास
दोघींनी बरीच बक्षिसं पटकावली दर वर्षीची
कधी बेस्ट-ऍक्टिंग तर कधी बेस्ट-सिंगिंगची
म्हणतात ना,
ढवळ्या बरोबर पवळ्या बांधला,
वाण नाही पण गुण मात्र लागला
शशीचं सगळं कसं सुरेख, छान चाललं होतं
पण कर्करोगानं अवेळीच तिला होतं गाठलं ...
तिला जणू देवांनी स्वर्गात, गायला बोलावलं
रियुनियन-भेट, हेच तिचं अंतिम दर्शन ठरलं ...
डोळे मिटले की वाटतं ती आहेच जवळ-पास
तिच्यासाठी हृदयामध्ये एक कप्पा आहे खास
🌷@तिलोत्तमा विजय लेले🙏🕉️🌅
Leave a Reply