कविता – 🌷 ” एक ऋणानुबंध “
कवयित्री – तिलोत्तमा विजय लेले
तारिख – २० डिसेंबर २०१६
गौमाता देते जणू तिचं सत्वं, दुग्ध-रूपानं …
त्यात, दैवी-शक्तीचा-अंश ” कल्पा “प्रमाणं …
प्रत्येक गाय ही मुलत: असतेच ‘कामधेनू’ …
तिच्या सेवेमुळे, पुलकित होती अणु-रेणु …
तिच्या आशिर्वादे सर्व कामनांचा, होतो अंत …
“आत्मशुद्धी” होऊन रूपांतर होते संत-महंत …
वसू-वारस-दिन सोडता, सर्व विसरती गौचे ऋण …
मातृ-पितृ ऋणा-इतकंच, गौचे स्थान महत्व-पूर्ण …
जसं कल्पतरुचं प्रत्येकच अंग-प्रत्यंग उपयोगी,
गोमातेची प्रत्येक गोष्ट-न्-गोष्ट महद्-उपयोगी …
दूध-दही-ताक-लोणी-तूप-गोमूत्र आणि शेण …
गाईशिवाय माणसाला असंभव जीवन जगणं …
केवळ अशक्यच, गोमातेचं प्रचंड ऋण फेडणं …
आईच्या-तोंडून ऐकलेली, माझ्या लहानपणीची …
यावेळी गोष्ट आठवतेय्-आमच्या कपिला गाईची …
खूप वर्षांपूर्वी-आमच्या गोठ्यात घराच्या परस-दारी …
कपिला नावाची गाय, जिची फार माया परस्परांवरी …
आई स्वतःच कपिलेची संपूर्ण सेवा मनोभावे करी …
कपिला पण न बोलताच प्रेम डोळ्यांतून व्यक्त करी …
कधी कधी तर आईला-हंभरुन हुंकार भरुन दाखवी …
कपिलेच्या डोळ्यांत सदा तरळे मूक-कृतज्ञतेची झाक …
आईच्या वागण्यात-स्पर्शात सदैव असे वात्सल्य-भाव …
जणू काही ती, होती पूर्व जन्मीची कुणी सखी-सोबती …
नेहमीच वाटे, नक्कीच ऋणानुबंधं असावेत काहीतरी …
यापुढे काय घडलं, ते सविस्तर वर्णन दुसऱ्या भागांती …
🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆
Leave a Reply