कविता - 🌷 " एकमेव सुवर्णसंधी "
कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले
भारतीय संस्कृतीत मंगल-कार्य असो, सणवार असो
पूर्वजांच्या नावाचा-वंशाचा-गोत्राचा, उल्लेख असतो
ज्यांनी कुटुंबियांसाठी आयुष्यभर काबाड-कष्ट केले
त्यांच्या भरण-पोषणासाठी दिवस-रात्र नाही पाहिले
अशा आपल्या पितरांसाठी पंधरा दिवसांचे आयोजन
या पंधरवड्यात पितरांचे पूजन-तर्पण-व-पुण्य-स्मरण
पितृ-स्मरणा-प्रीत्यर्थ दर वर्षांतील हा काळ महत्त्वपूर्ण
या रितीने पितृपक्ष-श्राद्धपक्ष-महालय-नियोजन संपूर्ण
भाद्रपदातील संपूर्ण वद्य पक्ष हा पूर्वजांसाठी समर्पित
पितृ-पक्ष, श्राद्ध-पक्ष, पितृ पंधरवडा म्हणून आरक्षित
जिथे श्रध्दा असते, तिथेच पितरांचे श्राध्द होऊ शकते
"श्राध्द" म्हणजे दिवंगत व्यक्तीचे, पुण्य-स्मरण असते
ज्या तिथीस पितरांचा मृत्यू, त्याच तिथीला श्राद्ध होते
म्हणून पितृ पक्षातील सर्व तिथींना खास महत्त्व असते
शतकानुशतके जपलेली-जोपासली गेली आहे ही प्रथा
मंत्रोच्चारे अन्नदान व पिंडदानाने लाभेल पितरांची-कृपा
पितरांच्या संतुष्टीसाठीच विधिवत श्राद्धविधी नियोजित
पितृस्मरणा-प्रीत्यर्थ ब्राह्मणास-अन्न-दान-धर्म आयोजित
अप्रत्यक्षपणे पूर्वज कुटुंबियांचे संरक्षण करीत असतात
स्वतःसाठी विधीवत पिंडदानाची अपेक्षा ठेवून असतात
प्रसन्न होऊन आपल्यालाही मूकपणे आशिर्वादच देतात
दुर्लक्षित, दु:खी पितरांच्या शापास-"पितृदोष" म्हणतात
ज्यांनी जिवंतपणी खूप काही केलं, ते ऋण फेडण्याची
पितृ-पंधरवडा ही सर्वांसाठीच आहे, एकमेव सुवर्णसंधी
🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆
Leave a Reply