कविता – 🌷 ” एकमेव रतन “

कविता - 🌷 " एकमेव रतन "
कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले

जो जो जन्मा आला, तो एक ना एक दिवस जाणारच
मोजून मापून आणलेले श्वास कधी-ना-कधी संपणारच

असं असूनदेखील एखाद्याचं जाणं मात्र फार खटकतं
कोणाचा कोण असूनही वा नसूनही, जीव हळहळतो

नाव "रतन"आणि नावाप्रमाणेच अत्यंत अनमोल रत्न
साधीच राहणी पण दुसऱ्याचं भलं करण्याचाच प्रयत्न

समुद्र-मंथनातील अमृत, एकमेव 'रतना'तच सामावले
संपूर्ण आयुष्यभर देशात-जगभरात तेच, वाटत फिरले

देण्यातील खरा-आनंद चेहऱ्यावर त्यांच्या झळकायचा
ज्ञान-दान-संशोधनात मदतीचा सढळ हात होता त्यांचा

कोट्यवधींची आर्थिक मदत विद्यापीठांना-विद्यार्थ्यांना
भारतीय संस्कृतीचा-ज्ञानाचा झेंडा विश्वात फडकवला

उद्योगपती काल होते, आज आहेत, असतील यापुढेही
पण रतन टाटांच्या तोडीचा-'देव-माणूस'पुनः होणे नाही

🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏 🕉🔆

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: Content is protected !!