कविता – 🌷” एकच मागणं “


कविता - 🌷" एकच मागणं "
कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले

प्रत्येक क्षणी जसं सृष्टीचं रूप पालटतं ...
त्याच धर्तीवर,
क्षणो-क्षणी, आपलं, भाव-विश्वं बदलतं ...

छानशा झोपेनंतर सगळंच कसं ताज-तवांनं वाटतं
जसं-पावसाची-सर-पडून-गेली-की-वातावरण-होतं
जसं दिवाळीला पहाटे अभ्यंग-स्नान करून वाटतं
ताज्या-फराळावर ताव मारताना मस्त गप्पांत रमतं

झर- झर वाहणारा निर्झर ...
झुळु-झुळू वाहणारं वारं ...
सळ-सळ करणारी झाडं ...
खळ- खळ वाहणारं जल ...

सर्व नाद- दृश्य- चित्रं, मनाला वाटतात गोड ...
प्रकृतीनं निर्मीलेल्या गोष्टी खास देतात जोड
नुकसान करी मानवी-निर्मितीची स्वार्थी-खोड ...

अनंत-कोटी चुकांचं परिमार्जन ...
तूच करू जाणे जगत-नारायण ...
मनं तुडुंब भरलं आहे कृतज्ञतेनं ...
हात जोडून आता एकच मागणं ...

नवीन चुका, पापं न व्हावी हातून ...
सदाचरणात जावो उर्वरीत जीवन ...
सद्कार्यच व्हावं यथाशक्ति हातून ...
प्रत्येक स्वरूपी व्हावं तुझंच दर्शन ...

🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉🔆

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: Content is protected !!