कविता -🌷 ” उमलता, अंतर्-मनीची कळी “
कवयित्री – तिलोत्तमा विजय लेले
तारिख – शनिवार, २७ मे २०१७
ही गोष्ट आहे खूप-खूप वर्षां-पूर्वीची,
ती गोरेगाव-मुंबईला रहात असतानाची …
मुंबईच्या पावसाळ्याचे ते दिवस होते …
पावसाने चांगलेच मनावर घेतले होते …
सकाळी स्नान करून रोजच्या सवयीने …
सूर्य-दर्शन घेऊन-झाडांना पाणीही द्यावे ,
तिनं वर पाहिलं तर आलं होतं अंधारून …
काळ्या-ढगांनी आभाळ गेलेलं झाकोळून …
हे पाहून थोडी अंतरमनातून खट्टू होऊन,
आकाशाकडे परत पाहिलं, तिनं निरखून …
तिच्या लाडक्या सूर्य-देवाचा नव्हता पत्ता …
प्रकाश-किरणांचा लवलेश सुध्दा नव्हता …
पावसाने द्विधा मनस्थितीत सापडली होती …
ओली झाली होती कुंडीतील झाडं व माती …
शेवटी काहीशा विषण्णं-जड-निराश मनाने,
निव्वळ शास्त्र-म्हणून तुळशीला पाणी दिले …
तिने मनोमनच नमस्कार केला डोळे मिटून …
डोळे उघडल्यावर, शत-शत जल-थेंबातून …
झाले तिला, अद्भूत दिव्य असे-सूर्य-दर्शन …
पूर्णतः कृतकृत्य होऊन-दोन्ही-हात जोडून …
फक्त एकाच सूर्यदेवाची अपेक्षा होती तिला …
जसा आंधळा मागणं मागतो, एकच डोळा …
प्रत्येक थेंबा-थेंबातून प्रत्यक्ष लकाकत होता …
डोळे मिचकावून प्रकट-दर्शन देता रविराजा !
मघाशी अकारणच दु:खी-कष्टी झाले म्हणून …
अत्यंत अपराधी वाटून-स्वमनाला दोष देऊन …
जेव्हा झालं होतं सूर्यदेवाचं-मनाजोगतं-दर्शन …
बेहद खुश होऊन स्वारी हसली होती खुदकन्
तिच्या अंतर्मनीची कळी-अलगद गेली उमलून …
🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🌅
Leave a Reply