कविता :🌷’ उपाशी झोपू देत नाही ‘


कविता :🌷' उपाशी झोपू देत नाही '
कवयित्री : तिलोत्तमा विजय लेले

ये है बंबई नगरिया तू देख बबुआ, देख बबुआ
वडा-पाव की लज्जत, तू आके चख ले बबुआ...

गरमागरम वडापाव म्हणजे खवैयांचा, जीव की प्राण
पोट भरगच्च भरी,जीभेचे चोचले पुरवी,मुंबईची शान

इतिहास सांगे आजच्या दिवशी वडापाव जन्मा आला
पुढे मुंबईच्या खाद्यसंसकृतीचा,अविभाज्य भाग बनला

नुसत्या खमंग वासाने,पोटात भूक,तोंडाला पाणी सुटते
मुंबई व वडापाव या दोहोंचं घट्ट समीकरण, खास आहे

आज दिवशी"जागतिक वडा पाव दिवस" साजरा होतो
रस्त्याच्या कडेला,उपहारगृहात सर्वत्र वडा-पाव मिळतो

खमंग तळलेला, कुर्रकुरीत, आतून लुसलुशीत, चविष्ट
कमी किंमतीत आनंद देई मनसोक्त,पोट भरतो उत्कृष्ट

खवय्येप्रेमी केवळ वासावरुन, त्याची चव ओळखतात
परदेशी दबदबा-मुंबईत पर्यटक आवर्जून चव चाखतात

वडा-पाव नावडणारी व्यक्ती, मुंबईत मिळणं अशक्यचं
अल्पावधीत लोकप्रिय,त्याची ख्याती पसरलीय सर्वत्रच

पाच-मैलांवर भाषा बदलते,तशी वडापावची चव बदलते
काही वडापाव प्रिय सारणामुळे,काही चटपटीत चटणीने

महाराष्ट्रातील प्रसिद्ध वडा पाव अनेक-जणांचं पोट भरतो
काहींचा नाश्ता, दुपारचं किंवा रात्रीचं जेवण सुध्दा असतो

सर्वांचे पोट भरून, वडापाव महत्त्वपूर्ण भूमिका बजावतो
खिशाला परवडणा-या दरात तो ताजा-गरमागरम मिळतो

या जगप्रसिद्ध पदार्थास"सर्वात जलद फास्ट फूड"म्हणतात
मुंबईची खूणगाठ, "वडा पाव ही विशेष ओळख" म्हणतात

मुंबई-गिरणी-कामगार-संस्कृतीत, वडापाव सर्वप्रथम रुजले
गिरणी कामगारांनी या मराठमोळ्या पदार्थास उचलून धरले

देशी-विदेशी भाऊबंद, चीज, नाचो, शेझवान वडापाव आले
मसाला, स्वीटकॉर्न,मेयोनिज आदी वडापाव नवीन प्रकारचे

सर्व जनतेचा आवडता पदार्थ, शौकिनांची संख्या कमी नाही
म्हटलं जातं,वडा-पाव कधी कोणास, उपाशी झोपू देत नाही

🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: Content is protected !!