कविता -🌷 ' उद्या काय होणार '
कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले
तारिख - रविवार, ७ एप्रिल २०२४
उद्या काय होणार, हे जर कळले असते ...
आयुष्यातील ते अनपेक्षित, अमुल्य क्षण,
कापरासारखे भुर्र उडून जाऊ दिले नसते ...
उद्या काय होणार, हे जर कळले असते ...
आठवणींच्या त्या सुगंधी, रेशमी लड्यांना,
अलगद उलगडून, पुन्हा गुंतुच दिले नसते ...
उद्या काय होणार, हे जर कळले असते ...
आसुसलेल्या-हळव्या सोनेरी क्षणा-क्षणांना,
डोळ्यांतून झरझर नित पाझरु दिले नसते ...
उद्या काय होणार, हे जर कळले असते ...
जीवघेण्या त्या झंझावाती सुसाट वादळाने,
घरा-दाराला अजिबात हादरवूच दिले नसते ...
उद्या काय होणार, हे जर कळले असते ...
भविष्यात कळत-नकळत झाल्या चुकांना,
आवर्जून-संपूर्ण-टाळून, होऊच दिले नसते ...
'काल'संपला, नवा-कोरा आजही उगवला ...
डोळ्यांत तेल घालून जो सतर्क राहू शकेल,
त्याची'उद्या काय होणार'ही चिंताच मिटेल ...
🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆
Leave a Reply