कविता -🌷 ” उणीव-पिंपळ पानाची “

कविता -🌷 " उणीव-पिंपळ पानाची "

कविता -🌷 " उणीव-पिंपळ पानाची "
कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले

मनोभावे जपलेलं असं ते एक पिंपळपान
वार्यावर अलगद-हाती-आलं, जणू विमान...

युगानुयुगे हिरवंगार, टवटवीत सुंदर, सुरेख,
आनंद-पसरवणे हीच खरी सौंदर्याची-मेख...

आठवणींच्या विश्वातील, होतं सुवर्ण-पान,
उनाड-मोकळं-ढाकळं, असं एक माळरान...

अजुनही करी, धुंद-बेधुंद-स्मृती-गंध बेभान
आयुष्यामधील मधाळ, ते क्षण-मौल्यवान...

साठवण-बालपणाची, रम्य त्या-तारुण्याची
असंख्य हळुवार नाजुकशा-भाव-भावनांची...

पिंपळ-पारावरती खेळलेल्या पाठशिवणीची
ओळखीतल्या विशेष त्या चेहऱ्या-मोह-याची...

मनाच्या सात-कप्प्यात जपलेल्या, आठवांची
उणीव आहे भिरभिरणार्या त्या पिंपळ-पानाची...

🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: Content is protected !!