तारिख – २६ सप्टेंबर २०१६
कवितेचं नाव-🌷” उघड नयन देवा “
कवयित्री – तिलोत्तमा विजय लेले
आज सहजच विचार डोकावला …
आता जर ईश्वर फिरुनी जन्मला,
किंव्हा देव-रुपात पुन्हा अवतरला,
पृथ्वी-तलावर सर्व ठीक करायला …
किती मेहनत घ्यावी लागेल त्याला,
जाड गेंड्याची कातडी असलेल्या,
आजच्या समाजास सरळ करायला …
सत्-युगातील मूल्यं गळी उतरवायला …
देव-परमेश्वर वगैरे तो असला तरी,
त्या परलोकातला, येथील ही मंडळी
सगळी, मोडता घालण्यास टपलेली
त्यांचं नेमकं हेच काम आहे ‘असली’ …
ते स्वतः काहीही करणार नाहीत,
दुसऱ्यालाही करू देणार नाहीत …
नुसती चर्चा-सत्र करुन आयोजित,
बसतील दुरून सारी मजा चाखीत …
भगवन्ता, तुझा काळ होता चांगला …
मनुष्य अजून “माणूसच ” होता भला !
आज त्याचा तोलच आहे पार सुटला,
पशु व मानव दोहोंत फरकच ना उरला …
तू तर मेहनतीनं बनवलंस मनुजा,
तुझी फसवणूक कशी झाली बा ?!
आम्ही पामर भोगतो आहो सजा …
सर्वजण खुशाल मारताहेत गमजा …
यावर एक उपाय योजना म्हणून,
काहींतरी चमत्कारच कर दणकून …
उघड आता, ढोंगी कुटीलांचे नयन …
तेंव्हा कुठं जरा जिवास वाटेल चैन …
🌷@तिलोत्तमा विजय लेले
🌅🕉🙏🌷
Leave a Reply