कविता - 🌷 " उंच भरारी कतृत्वाची "
कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले
माणसाचं आयुष्य घडवण्यात त्याच्या,
भोवतालच्या लोकांचा, वातावरणाचा,
परिस्थितीचाच असतो सिंहाचा वाटा
जन्मदाते त्यांच्यावर संस्कार करतातच
पण परिस्थितीच मोठी शाळा व शिक्षक
स्थिती शिकवते जे ज्ञान, ना देई पुस्तक
चांगल्या स्थितीत,सर्व काही बिनबोभाट
पण तीच स्थिती बिकट झाल्यावर मात्र
भल्या-भल्यांच्या, तोंडचं पाणीच पळतं
लहान मुलांना नीट निरखून पाहिलं तर,
समजतं ती मुलत: असतात फार हुशार
जेथे लाड होतात, तेथेच ती हट्ट करतात
जेथे त्यांची डाळ न शिजणार, हे माहित
त्यावाटेला चुकुनही ते फिरकणार नाहीत
गोर-गरिबांच्या घरा-घरातील लेकरं-बाळं,
ती अकालीच प्रौढ बनतात परिस्थितीमुळं
पण संधी मिळताच रात्रीचा दिवस करून
कामं करती सर्व शक्तीनिशी झोकून देऊन
मग यांच्यातूनच झाले अथी-रथी महारथी
दिपवून टाकलं करुन, भव्यदिव्य करामती
बाबासाहेब आंबेडकर, धीरूभाई अंबानी
जे के रौलींग,हँरी पाँटर-सीरीजची निर्माती
कॉमेडीचा-सम्राट, चार्ली चँप्लीन
अँपलचा-सीईओ, स्टीव्ह जाँब्ज
अमेरिका-प्रेसिडेंट,अब्रँहम लिंकन
नावांची यादी तर प्रचंड लांब-लचक
त्यांच्या कतृत्वाची भरारी, उंचच-उंच
🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆
Leave a Reply