कविता – 🌷 ‘ आहे कोण ? ‘
कवयित्री – तिलोत्तमा विजय लेले
तारिख – शनिवार, २ मार्च २०२४
वेळ – दुपारी, ४ वाजून २५ मि.
भूs-भूs-भूs-भू कोण करी ?
लक्ष दिलं की, शेपटी हलवी …
चेंडू फेकताच दौडत जाई …
क्षणातच शोधून, घेऊन येई …!
वेळ जर झाली, जेवणाची …
दरदर-खेचत-खेचत घराकडे येई …
घराच्या बाहेर खुट्ट वाजलं जरी,
वरच्या पट्टीत, मग आवाज करी …
घरात कुणी जर आजारी असेल,
त्याच्या उशाशी, तो शांतपणे बसेल …
त्याच्यावर घराची पूर्ण जबाबदारी …
घराचा सच्चा तो पहारेकरी …
फिरण्याची येता त्याला हुक्की,
आणून देतो, गॉगल्स-बूट-टोपी …
समुद्र म्हटला की स्वारी होते खुश …
डुंबत असताना, उठण्यास नाखूष !
रेतीत गोलांट्या उड्या मारी …
“बंटी छू” म्हणताच, झडप घाली …
सांगा पाहू, हा आहे तरी कोण ?
अर्जुनचा मित्र पण चोरांचा दुष्मन …
🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆
Leave a Reply