कविता - 🌷 ' आशिर्वाद '
कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले
तारिख - शुक्रवार, २४ मे २०२४
वेळ - रात्री, ९ वाजून ४५ मि.
आयुष्यात आपल्या, कधी भेटणार आहे कोण ?
हे विधीलिखित आहे की नाही-समजणं कठीण
महासागरात ज्याप्रमाणे दोन ओंडक्यांची टक्कर
कधी-कोठे-कशी व केव्हा होणार, जाणे तो ईश्वर
पोतडीतून खूप पेंटिंग्ज काढून टेबलवर पसरुन,
त्यातून एक पेंटिंग बाबांनी माझ्या हातातच दिलं
ते साई-बाबांचं पेंटिंग होतं जाड-कार्ड-बोर्डवरचं,
सुकून-जाळी पडलेल्या, पिंपळाच्या पानावरचं
सफेद-ऑइल-पेंट वापरुन चित्र, पेंट केलेेलं होतं
तशाच प्रकारची-शिवशंकर-श्रीकृष्ण-गुरु-नानक
वगैरे पेंट केलेली सगळीच पेंटिंग्ज मला दाखवून,
मग मजकडे, हळूच एक प्रश्नार्थक कटाक्ष टाकून
स्तब्ध झाले, त्यांना मदत करावी या एकमेव हेतूनं,
सर्वात प्रथम दाखवलेलं साईबाबांचं चित्र, मी घेतलं
एवढे वयोवृद्ध असूनही चार-चार मजले चढून येणं,
या वयातही पेंटिंग्ज विक्री करणं, मला वाईट वाटलं
त्या चित्राची किंमत त्यांना दिल्यावर, जरा बरं वाटलं
मग मसाला चहा मागवला,तो पिऊन मला तोंडभरुन
आशिर्वाद देत म्हणाले "बेटी,इस-चित्रको फ्रेम करके,
" हमेशा से सामने ही रखना इसे, तुम्हारी नजर के "
🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆
Leave a Reply