कविता : 🌷 ' आव्हान '
कवयित्री : तिलोत्तमा विजय लेले
तारिख : सोमवार, ३ जून २०२४
वेळ : दुपारी, ५ वाजून ४३ मि.
सगळं सुरळीत असताना काळोख दाटतो
वेळ निभावून ने,आतून आवाज बजावतो
अशावेळी आपलेही परक्या-सम वागतात
हात आखडूनच, मदतीचा आव आणतात
चूक-का-बरोबर-हाच वितंडवाद घालतात
मदत-वेळीच-करावी, सोईसाठी विसरतात
बोलणं आणि कृती यातील फरक समजून
अस्सल-बेगडी, सुखदायी-मृगजळ उमजून
कोण धोरणी,कोण राजकारणी,कोण खरा
कुणाचा अंतस्थ हेतू काय,पारखायला हवा
मनाचा हिय्या करुन पाऊल उचलले जावे
जे मनास योग्य वाटेल, तसे वागायला हवे
आजतागायत जगणं, साधं सरळसोट होतं
यापुढे जे वाढून ठेवलंय,एक आव्हान मोठं
अंतिम निकालच महत्त्वाचा, तपशील नव्हे
म्हणून आजपासून जे जरुरी,ते करीत जावे
🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆
Leave a Reply