कविता – 🌷 ” आभास “


कविता - 🌷 " आभास "
कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले

सोनेरी उन्ह कोवळे, अंगाशी बिलगावे
अलगद सावली संगे फेर धरुन नाचावे...

सलगी करण्या, झुळूक सुगंधित यावी
बघता बघता, सारी स्वप्न-नगरी वसावी...

पावलो-पावली, चाहूल-सुखाची-व्हावी
वेड्या मनाला नखशिखांत भुलवणारी...

शब्द होऊनी सारथी, मनी प्रीत जागवती
मन भरारी घेऊनी अनुरागाला येई भरती...

भुरळ घालण्या, आभाळी रम्य रंगसंगती
आभास हा जणू की स्वर्गीय-सुख-प्राप्ती...

🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: Content is protected !!