कविता :🌷 ” आनंद-कस्तुरी “


कविता :🌷 " आनंद-कस्तुरी "
कवयित्री : तिलोत्तमा विजय लेले

नीर क्षीर विवेके हंस आलस्यम् त्वम् एव तनुषे चेत् ।
विश्वस्मिन् अधुना अन्य: कुलव्रतं पालयिष्यति क: ॥

आयुष्याच्या महासागरात
अचानक ओंडके भेटतात...
क्षणभराच्याच सहवासात,
कैक आनंद-लहरी उठतात...

ती आनंदाचीच देवाण-घेवाण
त्यात मी-तू पणास नसे स्थान...
कुणाची साथ काही श्वासांची,
कुणा एखाद्याची काही तपांची...

सहवासाचा लाभ, भेट महत्त्वाची...
नगण्य असे ती किती काळासाठी...
ऋणानुबंध टिकवणे हेच महत्त्वाचे,
पूर्व-नियोजित असते होणे-न-होणे...

नीर-क्षीर-विवेक असणे, हे जरुरी
मग नपश्यात होतील सर्व कुरबुरी...
आनंदाचे वारू, धाव घेतील चौखूरी
मग शोधावी न लागे, आनंद-कस्तुरी...

🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: Content is protected !!