कविता – 🌷 ” आनंदाचा कंद ” तारिख – १५ डिसेंबर २०१६

कविता – 🌷 ” आनंदाचा कंद “
कवयित्री – तिलोत्तमा विजय लेले
तारिख – १५ डिसेंबर २०१६
क्षण आपणा मिळती …
क्षण आपणा दिसती …
क्षण क्षण मिसळुनी …
आयुष्या ते उजळती …

श्वास रोधून मनं झालं गं स्थिरं …
श्वास सोडून मनं होतसे पसारं …
श्वास-न्-श्वास मिळवूनं,
आयुष्याचं सुटतं गणितं …

चित्त आनंदी, चित्त स्वच्छंदी …
बागडे सर्वत्र, लेवुनिया धुंदी …
चित्त डोलते गं, चित्त नाचते …
इंद्रधनूच्या रंगामध्ये ते खेळते …

बुद्धी तेज-कुशाग्र, बुद्धी-तल्लखं …
ब्रह्मानंदी तल्लीन, परि ती चलाखं …
ध्यास लागला, ध्यास धरिला …
ईश्वराच्या चरणी, मोगरा वाहीला …

स्वप्नं रंगीत, स्वप्नं संगीतं …
स्वप्नं- स्वप्नातं येऊन,
डोळ्यां अति सुखावंतं …

सूर सुरेल-मधुर, सूर-संगत-अमूर्त …
सूरांमध्ये सूर मिसळून,
संगीत करी सार्थकं …

जीव एकला, जीव आपला …
जीवात जीव मिसळून,
तो आनंदाचा कंद झाला …

🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆
















Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: Content is protected !!