कविता – 🌷 ‘ आनंद ‘

कविता - 🌷 ' आनंद '
कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले
तारिख - शनिवार, २५ मे २०२४
वेळ -  दुपारी, ३ वाजून २४  मि.

कैक वेळा घटना घडून जाते, मनाला जणू स्तब्ध करते
मला भेटलेले सद्गृहस्थ, बाकी लोकांना नाहीच दिसले
हे पचवणं जड होतं, पुरावा म्हणून चित्र मदतीला आले
जणूकाही साईबाबा, माझ्या मदतीला धावून आले होते

शेवटी मी घेतलेलं चित्र दाखवलं,बघून त्यांची बोलती बंद
तरी माझं मन अस्वस्थ जोवर गोष्टीचं बुद्धीला पटेल असं
स्पष्टीकरण मिळत नाही, तोपर्यंत निष्कर्ष काढणंही व्यर्थ
मी स्वतः मजल्यावरच्या अन्य सर्व ऑफिस मध्ये जाऊन,

अमुक-अमुक पेंटर-बाबांनी काही विक्री केली का चित्रांची
असं विचारता, अशा वर्णनाची एकही व्यक्ती त्या कोणीही,
त्या संपूर्ण दिवसभरात, अजिबात पाहिलेली सुध्दा नव्हती ...
हे बोलणं सुरु असता, सिटी-बँकेतुन मला आला दूर-ध्वनी

मी सिटी- बँकेत गेले, बाजूच्या फिरोजशाह मेहता रोडवर
तेथे खूप मोठी ऑर्डर जणूकाही होती माझीच वाट पाहत,
बँकेत गेल्यावर मला मिळाला ऍडव्हान्स अमाऊंटचा चेक ...
आनंद झाला कारण ही होती सर्वात मोठी सप्लाय-ऑर्डर ...

🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: Content is protected !!