कविता 🌷’ आठवणींच्या जगात ‘

तारिख –  शुक्रवार, ७ एप्रिल २०१७
कवितेचं नाव-🌷” आठवणींच्या जगात “…             
कवयित्री – तिलोत्तमा विजय लेले 
लहानपण आठवता तिला आठवते शाळा  
बालपणीचा अविभाज्यं घटक असे शाळा
तिचे सगळे शिक्षक फार-फार होते चांगले,
आजचे हे कवन आहे फक्त सरडे सर यांचे 

ते, तिच्या एका भावाचे-सुरेश अण्णाचे,
मिरजेेचे मित्र-तो शिकत होता, तेव्हाचे    …
त्यामुळे तिच्यावर जास्तच लक्ष द्यायचे   …

बालपणी, तिचा आदर्श म्हणजे-शिक्षकवर्ग  
तिला सुदैवाने अत्यंत उत्तम शिक्षकांकडून,
सुसंस्कार,शिक्षण,मार्गदर्शन, सदैव लाभलं  

वास्तविक त्याकाळचे, त्यांचे तुटपुंजे पगार …
त्यात खाजगी शाळा,विना सरकारीअनुदान

त्यामुळे शिकवण्याची कळकळ असलेलेच
शिक्षक व्हायचे,” विद्यार्थ्यांना शिकवण्याचं,
त्यांना घडवण्याचं, ध्येय उराशी बाळगूनच,
अक्षरश: शंभर- टक्के द्यायचे, जीव ओतून

ती चौथीत व सातवी इयत्तेत असताना,
शाळाच निवडायची सुयोग्य विद्यार्थ्यांना,
स्काँलर-शिपची परीक्षा तयारीनं द्यायला,
अन् यथोचित प्रशिक्षणही द्यायची त्यांना !

नंतर परीक्षा-केन्द्रा‌ला न्यायची,
परीक्षा झाली की परत आणायची,
सर्व जबाबदारी त्यांचीच असायची
त्याच काळात ही गोष्ट होती घडली 

तिची शाळा मध्यमवर्गीय कायम गरीब 
पण शिक्षकांचं हृदय मात्र अतिविशाल  
त्यांच्या तुटपुंज्या मिळकती-मधूनही ते,
खर्या आनंदाने विद्यार्थ्यांवर खर्च करायचे

हे पक्कं माहीत असूनही की शाळेकडून,
खर्चाचे पैसे काही परत मिळणार नाहीत 
गंमतीची गोष्ट म्हणजे,
असं असूनही, शिक्षकांत चुरसच असायची
विद्यार्थ्यांना परीक्षेला-कोण नेणार याविषयी

यापुढचा वृत्तांत पाहूया दुसर्या भागात 
व संचार करूया आठवणीच्या जगात  …
🌷@तिलोत्तमा विजय लेले 

🙏🌅🕉🌷🙏
















Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: Content is protected !!