कविता : 🌷’ आठवणींचा झुला ‘

कविता : 🌷' आठवणींचा झुला '
कवयित्री : तिलोत्तमा विजय लेले

सर्व भावांमध्ये पाचवा क्रमांक अशोकअण्णाचा
तेजस्वी कांती, उमद्या, रुबाबदार व्यक्तिमत्वाचा

अगदी लहानपणी गाडेकरच्या गच्चीवर, रात्रीला
आम्हां बच्चे कंपनीला,तो-रंगवून-गोष्टी सांगायचा

नुकतेच भारतात टिव्ही मिळू लागले होते,तेव्हाच
मला विचारलं,"टिव्ही हवा का?"मी-हो-म्हणताच

जेके ब्रॅण्डचा सर्वात-मोठ्या-स्क्रीनचा-टिव्ही-घेतला
तो हौशी स्वभावाचा-त्यामुळे खूप आनंदी होता

त्यावेळी कर्म-धर्म-संयोगाने क्रिकेटचे-सामने होते
त्यामुळे घरी-बिल्डिंगचे-आजुबाजुचे, लोक यायचे

त्या काळात फक्त आमच्या-घरी-टिव्ही-असल्याने
क्रिकेट-छाया-गीत-सिनेमा बघायला गर्दी करायचे 

मी शेंडेफळ म्हणून माझे,तो खूप लाड करायचा
माझ्यासाठी फॅशनेबल गॉगल्सही, तो आणायचा

थोडी मोठी झाल्यावर त्यावेळी-प्रसिध्द-असलेली
"ब्रासो-नावाची"ब्रॅण्डेड-साडी-आवडीने-आणलेली

तो हरहुन्नरी-होता,लोकांवर सहज छाप पाडायचा
बोलणं ऐकून,ऐकणारा मंत्रमुग्धच होऊन जायचा

नागपूरच्या विषम-हवामानाशी, जुळवून घेऊनही
परिक्षेतील धवल-यशाने डॉक्टर-पदवी मिळविली

दादाच्या मार्गदर्शनाखाली,अडचणींवर मात केली
मुंबईत पाठो-पाठ दवाखाने थाटले,तीन-ठिकाणी

तिन्ही ठिकाणी जम बसवून रुग्णांना बरे केले
त्यासाठी रात्रंदिवस धावपळ-भरपूर-परिश्रम-केले

अथक प्रयत्नांती-यशश्री-खेचून,मग श्वास घेतला
यामुळे घरच्या सर्वानाच खूप अभिमान वाटला

सर्व रुग्णांना,जणू-त्यांचा-नातलग-आहे,असं-वाटे
त्यामुळे-सार्या-रुग्णांचे-त्याच्यावीण-पान-हलत-नसे

लहान-मुलांची-भारी-आवड, खेळण्यात-रमायचा
सुदैवाने-तीन-लाघवी-मुलींमुळे-खूपच-खुश-होता

घरी-दोन-डॉक्टर, त्यामुळे-मला-बाळकडू-मिळाले
थेट-औषधांचे-ज्ञान-मिळून, आयुष्य सुकर झाले

इंजेक्शन-देण्याचे-रितसर-प्रशिक्षण-त्याने-दिले 
म्हणून घरच्यांना घरीच इंजेक्शनं देऊ शकले

रक्षाबंधन-भाऊबीज साजरी करतांना,प्रत्येक वेळी
नसलेल्या-भावांची-स्मृती-डोळ्यांत, दाटते-दरवेळी

काही निमित्ताने, झुलतो-सुखद-आठवणींचा-झुला
त्या-रम्य-स्मृतीत-रममाण, बहिणीचा-जीव-खुळा

🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: Content is protected !!