कविता – 🌷 ” आगमन ऋतुराजाचे “


कविता - 🌷 " आगमन ऋतुराजाचे "
कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले

"शारदा शारदाम्भोजवदना वदनाम्बुजे ।
सर्वदा सर्वदास्माकं सन्निधिं सन्निधिं क्रियात् ॥

"पृथ्वीवरील ‘कुसुमाकर’-वसंतऋतु तो मीच"भगवंत म्हणतात
वसंत पंचमीला श्रीपंचमी अथवा ज्ञानपंचमी असेही म्हणतात

'ॐ ऐं सरस्वत्यै ऐं नमः'या मंत्रोच्चारा-सहित-साग्रसंगीत-पूजा
पांढरे चंदन, धूप-दीप-नैवेद्यां-सहित शोडशोपचारे, पूजा-अर्चा

मनोभावे उपासना विद्या-बुद्धी-संगीताची-आद्य-देवी सरस्वतीची
गोड-केशरी-भाताच्या नैवेद्याने मानस-पूजा, विद्यादेवी-श्रीशारदेची

वसंत पंचमीलाच ब्रह्मदेवाने विश्व-निर्मिती केली अशी मान्यता
ऋतुराज वसंत ऋतूचे आगमन होते, वसंत-पंचमीचा-दिन येता

आगमनाच्या आधीच सुगंधांच्या रूपामध्ये ढोल नगारे वाजतात
मोहोर-पानं-फळा-फुलांची तोरणे निसर्गात, सगळीकडे फुलतात

स्वागतास फुला-फुलातून साद येते, कोकिळा पंचम-स्वरात गाते
वसंत ऋतुने बहरलेल्या गुलमोहोरांना, पोपटी-हिरवी पालवी-येते

तळपणाऱ्या उन्हाने अन् शिशिराने निष्पर्ण-वृक्षांवर, सुरेख कोवळी
तांबूस-पोपटी-हिरवी-पालवी केशरी-तुरे-लेऊन दिसते दिमाखात-उभी

सावली धरुन असलेला बहावा सुवर्णरंगी पिवळे घोस घेऊन मिरवतो
दिस येता उतरणीला मोहोरलेला अवघा निसर्ग, वाऱ्याबरोबर डोलतो

निसर्गातील रंगांची उधळण डोळे भरून पहात आस्वाद घेत, मनसोक्त
झाडांखाली वेगवेगळ्या रंगांच्या फुलांच्या जणू पायघड्या करतात तृप्त

बकुळ-वृक्षाखाली, वाऱ्यासवे जमिनीवर उतरणाऱ्या ‘गंध-चांदण्यांना’
ओंजळीत-गोळा करुन मनभरुन-सुगंध घेण्यात-आनंद-स्वर्गीय-सुखाचा

वसंतातला प्रत्येक दिवसच जणू सणाचा अन् विशेषत्वाने स्मरणाचाच
वसंतात जन्मले होते गोब्राम्हण-प्रतिपालक-छत्रपती-शिवाजी-महाराज

फुलाची कोमलता-शस्त्राची-कठोरता हा अनोखा संगम ज्यांच्या जीवनात,
ते-महान्-देशभक्त-क्रांतीकारक कवी-स्वातंत्र्यवीर-सावरकर जन्मले वसंतात...

भरभरून देणारा,"दाता"हा वसंत ऋतू, मानवी जीवन सुखी समृद्ध करणारा
समस्त सृष्टीस नटवणारा, उमलवणारा, खुलवणारा, तृप्तीने प्रसन्न करणारा

🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🌅

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: Content is protected !!