कविता – 🌷 ‘ आई अंबाबाईचा धावा ‘

कविता - 🌷 ' आई अंबाबाईचा धावा '
कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले
तारिख - रविवार, १४ एप्रिल २०२४
वेळ - संध्याकाळी, ७ वाजून ५२ मि.

आई अंबाबाई, हे आई अंबाबाई
कृपेची तू सावली आई अंबाबाई

काम-क्रोधाच्या या पाशां-मधुनी
जिवा-शिवाला सांभाळ गं आई

मोह-मायेच्या या जाळ्या-मधुनी
मम अंत:करणा, वाचव गं आई

मद-मत्सराच्या या वेढ्या-मधुनी,
निर्मळ भावनां सदा जप गं आई

दांभिकपणाची भावना मनातुनी
कायमची समूळ नष्ट कर गं आई

तनमन भक्तिच्या रचना करण्यात
क्षण-न्-क्षण रमू दे, नामस्मरणात

तुझ्या चरणाशी नतमस्तक होऊन
धन्य-धन्य होवो आई, सारं जीवन

🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: Content is protected !!