कविता - 🌷 " आंदण "
कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले
पोर्तुगीजांनी मुंबई, आंदण म्हणून दिली इंग्रजांना
मोकळा श्वासही महाग झाला होता, मुंबईकरांना...
चांगली-वाईट-कृत्यं-करून मोकळा होई करणारा
परंतु त्यांचेच पडसाद भोगतो, पाठी-मागे उरणारा...
सर्व बाजूंनी कोंडी, जन-सामान्यांची, हानी झाली
जणू "दे माय धरणी ठाय" अशीच अवस्था झाली...
कैक वर्षे लागली जेंव्हा स्वातंत्र्याची पहाट उगवली
दाही दिशांनी अनंत हस्तांनी, जणू पुष्प-वृष्टी झाली
नशीब घडवावं तसंच घडतं जणू वा-यावरची वरात
शुभद गोष्टींबरोबर आनंद-सुख-संपत्तीची भरभराट
दूर-दृष्टीने ऋतूनुसार सणा-वारांचं आयोजन करून
सर्वांशी-हसूनखेळून-सुखाची-लयलूट आंदण म्हणून
🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉🔆
Leave a Reply