कविता – 🌷 ” अस्सल-नायक शापित कर्ण ” तारिख – ९ डिसेंबर २०१६

कविता – 🌷 ” अस्सल-नायक शापित कर्ण ”    तारिख – ९ डिसेंबर २०१६
कवयित्री – तिलोत्तमा विजय लेले
उदारतेचं मूर्तिमंत उदाहरण …म्हणजेच ” सूत- पुत्र ” कर्ण 
महाभारतात त्याच्या इतका पराक्रमी, शूर, लढवैय्या योद्धा
शोधूनही सापडणं कठीण …

दुर्दैवाचा फेरा, त्याच्या जन्माच्याआधी-पासूनच सुरु झाला बहुधा …
कुमारी- माता कुंती व सूर्य यांचाच-हा तेजस्वी,मनस्वी व अद्वितीय पुत्र …
समाजाला घाबरून, तत्कालीन रुढींनाडावलून, काही करणं अशक्य असताना,
कुंतीने मनावर दगड ठेवून त्याग केला, लाकडी पेटीत जन्मजात तान्ह्या अर्भकाचा
वाहत्या जलाशयात सोडलं त्यास गुपचूप-हे “काळंकुट्ट-कृत्य”केलं,रात्रीच्या अंधारात 

कालांतरानं एका निपुत्रिक जोडप्याला, हा दैवानं पाठवलेला खजिना सापडला …
त्यांचा आनंद गगनात मावेनाराजमहालाऐवजी एका साध्या
सारथ्याच्या छोट्याशा घरातच, दुर्दैवानं कर्णाचं बालपण गेलं …

त्याला आईचं वात्सल्य राधेकडून मिळालं-म्हणून पुढे त्याचं नाव “राधेय-कर्ण” पडलं …
जन्मत: एकही गोष्ट त्यास सहज ना मिळाली-अगदी माता-पित्याची छत्रछाया असो,
किंवा योग्यतेनुसार शिक्षणासाठी गुरु-आचार्य मिळणं असो …
दर वेळी दर ठिकाणी “सूत-पुत्र” असं हिणवलं जाणं-योग्यता असूनही कायम, कमी लेखलं जाणं …
द्रोणाचार्यांनी नाकारलं, युद्ध-कलेचं शिक्षण-देणं …

तो निराश न होता, त्यांचेही जे-गुरु, परशुराम- यांचा शिष्य बनला, पण त्यासाठी ब्राह्मण
असल्याचं नाटक त्याला करावंच लागलं …मना विरुद्ध, खोटं-सोंग वठवावं लागलं …
झालं सर्व शिक्षण पूर्ण, तो सर्व काही शिकुन, युद्ध-शास्त्रात,झाला निपुण …
एकेदिवशी, गुरूंनी कर्णाच्या मांडीवर, डोकं ठेवून झोपले असता, वन्य किडा चावून 
मांडी रक्त-बंबाळ झाली, पण सहनशील कर्णानं हूं-कीं-चू नाही केलं …!
गुरुंची झोप-मोड होऊ दिली नाही,बिल्कुल-जाग येताच, परशुरामांनी त्याला शाप दिला 
वास्तविक पाहता, तो “कौंतेय” असल्याचं, अगदी सुरुवातीपासून पक्कं माहित होतं …
तरीही वेळोवेळी, त्याचा अपराध नसूनही, कित्येक शाप कर्णाला, भोगावे लागले …

अन तेही कदाचित या शूर- वीराला हरवण्यासकमी पडतील की काय,याची खबरदारी म्हणून,
देवेंद्र-अर्जुनाच्या पिताश्रीनी,वृद्ध-ब्राह्मण-रुपात सुर्योपासनेच्या वेळी, कर्णाकडून,कवच-कुंडलं,
” दान “म्हणून मागीतली,जी जन्म-जात होती-हे दान, कर्णाचे ” प्राण ” मागण्यासारखंच होतं …
तरीही तो ” दान-शूर-कर्ण ” मागे नाही हटला-उदार-दिलदार कर्ण स्वतःच्या शब्दाला”जागला “!

कुंतीनं ऐन युद्धाच्या आदल्या रात्री, त्याला सांगितलं त्याच्या जन्माचं रहस्य …
अन् बदल्यात कर्णाकडून, घेतलं वचन, तिचे कोणतेंही पाच-पुत्र जीवित ठेवण्याचं …!
शिवाय युद्धात, कोणतंही अस्त्र फक्त एकदाच वापरण्याचं वचनही तिनं घेतलं होतं …

त्याच्या जन्माचं रहस्य सांगून, त्याला मानसिक धक्का देऊन,
त्याला कमकुवत बनवण्याचाच, केवढा हा केविलवाणा प्रयत्न …
इतकं करूनही कर्णाचीच बाजू वरचढ-त्यामुळे जगातील सर्व नियम धाब्यावर बसवून,
कर्ण पाठमोरा, रथाचं जमिनीत रुतलेलं चाक काढण्याच्या प्रयत्नात असतानाच, अर्जुनानं,
संधी साधून, बाण मारून, केला कर्णाचा अंत …!
त्याआधी थोडयाच वेळापूर्वी , कर्णानं अर्जुनाला निःशस्त्रं म्हणून जीवदान दिलं होतं …

कर्ण,वास्तविकत: पांडवांचा ज्येष्ठ पुत्र …सर्वच बाबतीत उदार,ज्येष्ठ आणि श्रेष्ठ …
पण दैववशे, अधर्माची बाजू घेतल्यामुळं, त्याचं हरणं व अंततः मरणं होतं, अटळ …
पण त्यामुळे त्याचे सद्-गुण नाहीसे नाही होतउलट स्वनशिबाला बसला नाही दोष देत,
स्वतःच्या हिम्मतीनं शारीरिक-मानसिक बळ पणाला लावून,आयुष्याची रोवली भक्कम मेढ 

खरा-खुरा “नायक” असून, दैवजात करणीनं, त्याला हक-नाहक, गैररित्या शापित करुन
काळ्या रंगात, खलनायक बनवण्याचा फारच तुटपुंजा,हास्यास्पद,अन् केविलवाणा प्रयत्न 
जोवर पृथ्वीवर जीवन राहील …कर्णाचं कर्तृत्व, उदारपणाकायम-स्वरूपी झळकत राहील …
जनमानसी उदात्त-उदार-कर्ण कोरला गेलाय, ती तेज:पुंज प्रतिमा कधीच पुसली नाही जाणार …

कर्णाच्या वाट्याला सदैव फसवणूक येऊनही, त्यानं चांगलं वागण्याचाच सतत प्रयत्न केला
कुणालाहि,विन्मुख न पाठवून,शब्दाला जागलामैत्रीला,पुत्र-धर्माला,दिल्या वचनाला जागला !
अधर्मानं तो लौकिकार्थांनं, जरी मृत्यू पावला, तरी खऱ्या अर्थाने तो मरुनही अजरामर झाला …
अशा ” न- भूतो-न-भविष्यती योद्धयाला-अजात-शत्रू-कर्णाला,” मानाचा त्रिवार लवून मुजरा …

🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆
















Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: Content is protected !!