कविता – 🌷 ‘ अश्वत्थामा ‘ तारिख – शनिवार, २७ जानेवारी २०२४


कविता – 🌷 ‘ अश्वत्थामा ‘
कवयित्री – तिलोत्तमा विजय लेले
तारिख – शनिवार, २७ जानेवारी २०२४
वेळ – रात्री ८ वाजून २६ मि.

माणसं अशी विचित्र का वागतात …
ठीक असून, खुसपटं का काढतात …

यालाच का “सुख बोचणे” म्हणतात ?
स्वत:चा न्यूनगंड कुरवाळत बसतात …

दुसऱ्याला सदा कमी लेखू पाहतात …
अन् त्यातच धन्यता मानत राहतात …

दुसऱ्याला फसवणं फार सोपं असतं …
स्वत:च्या मनात मात्र ते सलतच राहतं …

शरिराची इजा औषधांनी भरुन येते …
मनात खोल, जखम भळभळत राहते …

वरवरची मलमपट्टी कामी येतच नाही …
जखमांवर खपली कधी धरतंच नाही …

असे अतृप्त जीव ‘अश्वत्थामा’ बनतात …
जन्मोजन्म तेल मागत हिंडतच बसतात …

‘करावे तसे भरावे’त्यांना उशिराने कळते …
पण हातातून वेळ निसटून गेलेली असते …

माणूस वेळीच जर, माणुसकीनं वागेल …
पृथ्वीवरही स्वर्ग-सुख-प्राप्त करु शकेल …

🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆
































Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: Content is protected !!