कविता : 🌷 ” अशी माझी शैला ताई “


कविता : 🌷 " अशी माझी शैला ताई "
कवयित्री : तिलोत्तमा विजय लेले

सदैव माझे लाडच करणारी माझी शैला ताई...
कधी माझी मैत्रीण तर कधी व्हायची ती आई...

लहानपणापासूनच ती खूप खेळकर व हुशार...
संगीत-गाणी-नृत्य यामध्येही, तिला रुची फार...

अत्यंत सुरेल आवाज, उपजत गाता गोड गळा...
भावंडांची आवड तिला, लावायची खूपच लळा...

रेखीव नाक-डोळे-सुंदर-आकर्षक चेहरा-मोहोरा...
लांब-सडक काळेभोर-घनदाट-केस व वर्ण गोरा...

स्वभावाने शांत, लाघवी, बोलण्यात जणू साखर...
सर्वांशीच मिळून-मिसळून, घाली मायेची पाखर...

नागपूर-विषम-हवामानात केला कसून अभ्यास...
सुवर्ण-पदकासह प्रथम क्रमांक पटकावून, पास...

डॉक्टर झाली-इंटर्नशिपचा पहिला पगार मिळाला...
पहिला पूर्ण पगार खर्चून, मलाच मस्त ड्रेस दिला...

पेशाने डॉक्टर, अचूक निदान, हाताला खूप गुण...
त्यामुळे तोटाच नाही कशाला, हवे तितके रूग्ण...

खूपच लांब-लांबवरून, रूग्णांची कायमची रीघ...
तिला भेटून-बोलूनच बरे होती अर्ध्याहून-अधिक...

अशी माझी शैलाताई, कायम कामामध्येच रमते...
तिच्या रूपाने, जणू साक्षात् लक्ष्मीच घरात नांदते...

@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: Content is protected !!