कविता : 🌷 ‘ अमोघ बाण ‘
कवयित्री : तिलोत्तमा विजय लेले
तारीख : मंगळवार, ५ सप्टेंबर २०२३
वेळ : संध्याकाळी, ६ वाजून ०३ मि.
झाडा-समानच महान असती, समस्त गुरु-जन
नित करिती सर्वांवरी अमूल्य-ज्ञान-कण-सिंचन
रणरणत्या उन्हात वृक्ष, सावली करिती शितल
किंचितही लागू न देती गुरु, भव-तापाची झळ !
फळं-फुलं-पानां-मुळांचं, अमूल्य असं हे वरदान
अथक परिश्रमांतून शिक्षक करीती ज्ञानाचे दान
इवल्या-शुध्द-बीजापोटीच सदैव होते वृक्षारोपण
कधी प्रेमानं-कधी रागावून, गुरु करिती मार्गदर्शन
हिरव्या भाज्या-वनौषधी, सुप्त सारीच पोषक-सत्वं
सदाचार-सुविचारांची, सत्गुरु शिकविती जीवनतत्वं
पूर येता झाडं-झुडपं पाणी अडवून नुकसान रोखती,
अज्ञानरुपी अंधार उजळून, गुरु ज्ञान-सिंचन-करिती
निसर्ग-दत्त अनमोल-अमाप, ठेवा हाच तो संपत्तीचा
ज्ञानार्जनातूनच उदय होतो, सुखद-समृद्ध-उन्नतीचा !
पृथ्वीतलावर झाडं म्हणजे, हिरव्या-सोन्याची-खाण
सुयोग्य गुरु-जन-लाभ म्हणजे रामाचा-अमोघ-बाण !
🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆
Leave a Reply