कविता – 🌷 ” अभूत-पूर्व जोडी ”
कवयित्री – तिलोत्तमा विजय लेले
तारिख – बुधवार, ८ मार्च २०१७
राधे शिवाय कृष्ण अधूरा …
शक्ति शिवाय शिव अपूरा …
सीते शिवाय राम अधूरा …
लक्ष्मीविना विष्णू अपूरा …
सृष्टी शिवाय विश्वाला नाही पूर्णत्वं …
नारी शिवाय नरास नाहीच पूर्णत्वं …
अवघ्या विश्वाचा गाडा,
आहे अधूरा अन अपूरा …
रथ हा, त्या जगन्नाथाचा …
हलतो, डुलतो, चालतो दिवस अन् रात्र,
या जोडीच्या शक्ति-युक्ति आणि बुध्दिनं …
जगन्नाथाच्या गाड्याची …
ही अभूतपूर्व अशी जोडी …
एकमेकां शिवाय दोघेही …
सर्वथा अधूरी अन् अपूरी …
🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🌅
Leave a Reply