कविता – 🌷 ” अभिमानास्पद लेणं “


कविता - 🌷 " अभिमानास्पद लेणं "
कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले

विधात्याचा प्रत्येकासाठीच, असतो खास बेत...
सर्वांनाच आयुष्यात मृगजळ लुभावती अनेक...

कधीच येऊ देऊ नये मनात, दूजा विपरित हेत...
वैराण वाळवंटी जिकडे-तिकडे, असे नुस्ती रेत...

बा मनुजा, आता तरी समजून घे, ईश्वरी-संकेत...
प्रत्येक वेळी, विविध त-हे-त-हेने तो देतो संदेश...

काय घेऊन बसला आहेस पैका-सोनं-रूपं-नाणं...
सद् आचार-विचार-कार्य हे माणिक-मोती-सुवर्ण...

तुझ्या हातात आहेच सद्गुणांचं खणखणीत नाणं...
तोच खरा दागिना, तेच खरं अभिमानास्पद लेणं...

🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: Content is protected !!